नगर : पाथर्डीत स्व.गोपीनाक्ष मुंडेंची जयंती साजरी

पाथर्डी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आज विविध उपक्रम राबवून त्यांच्या समर्थकांनी साजरी केली.दोन दिवसांपूर्वी आमदार मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, माणिक खेडकर, संजय बडे, महेश बोरुडे, डॉ. रमेश हंडाळ यांनी परळी येथे जात मुंडे यांच्या स्मारकाचे दर्शन घेत पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती.

आज सकाळी नाईक चौकात उभारलेल्या स्व. मुंडे यांच्या प्रतिमेचे अनेकांनी दर्शन घेतले. या निमित्ताने भाजपचे युवक नेते अमोल गर्जे यांच्या वतीने मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. या वेळी गर्जे यांच्यासह मुकुंद गर्जे, संदीप फुंदे, राहुल ढाकणे, आदित्य चतुर हे उपस्थित होते.

गर्जे म्हणाले की पद मिळाल्याने मुंडे मोठे झाले नाही तर त्यांच्यामुळे पदाला किंमत मिळाली. माजी नगरसेवक रामनाथ बंग मित्रमंडळाच्या वतीने सुद्धा मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी महंत माधवबाबा, प्रेस क्लबचे अध्यक्ष उमेश मोरगावकर, संजय मेहेरकर, दादा मर्दाने, राजेंद्र दुधाळ, उमेश सुपेकर, सलीम शेख , डॉ. रामराव बारगजे, माउली कोकाटे, दीपाली बंग उपस्थित होते. बंग म्हणाले की, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम स्व. मुंडे यांनी केले असून सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा.