नगर – ट्रान्सपोर्टचे ऑफीस फोडणारे दोघे जेरबंद एमआयडीसी पोलिसांची कारवाई

नगर – नागापूर एमआयडीसी येथील पूजा ट्रान्सपोर्ट ऑफीस तसेच गोडाऊनचे शटर तोडून चोरी करणारे दोघे सराईत तसेच एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. राहुल महेंद्र मखरे (वय २०, रा.नागापूर), सतीश मछिंद्र शिंदे (वय २९ रा.तपोवन रोड) असे आरोपींची नावे आहेत.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात विशाल राजेंद्र परदेशी यांनी फिर्याद दिली होती. पितळे कॉलनी, एमआयडीसी नागापूर येथील पूजा ट्रान्सपोर्ट ऑफीसचे गोडाऊनचे शटर उचकटून रोख रक्कम व दोन एलईडी टीव्हीचे सेट चोरी झाले चे फिर्यादीत म्हटले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्याक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार राहुल मखरे, सतीश शिंदे, सागर गोरख मांजरे यांनी केला आहे.

त्यांनी एमआयडीसी पोलिसांचे पथक तयार करून सापळा लावून राहुल व सतीश यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख छत्तीस हजार रुपये रोख रक्कम हस्तगगत केली. हे सराईत आरोपी असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. ते जामीनावर बाहेर होते. ही कारवाई पोसई पाठक, नंदकिशोर सांगळे, राजू सुद्रिक, किशोर जाधव यांच्या पथकाने केली.