Name Change: संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे नाव आता ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’; सरकारकडून अधिसूचना जारी

Name Change : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे  (change of name)  बदलली आहेत. या जिल्ह्याची नाव आता अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी बदलण्याची अधिसूचना जारी केली आहे.

राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी मागवलेल्या सूचना आणि हरकतींवर विचार करण्यात आला आहे. उपविभाग, गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महसूल विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याचा निर्णय मागील महाविकास आघाडी (MVA) सरकारने राजीनामा देण्यापूर्वी 29 जून 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.

दरम्यान, राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या सरकारने या ठिकाणांचे नामांतर (change of name) करण्याचा ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. कारण राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानंतर गेल्या वर्षी जुलैमध्ये शिंदे सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर (change of name)   करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

दरम्यान, आता राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे उपविभाग, गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महसूल विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.