नांदा सौख्य भरे… अरुण गवळीच्या लेकीच्या लग्नाचे काही खास फोटो

मुंबई – ‘डॅडी’ या नावाने कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची लेक योगिताचा विवाहसोहळा काल (दि. ८) पार पडला. मराठी अभिनेता अक्षय वाघमारेसोबत ती विवाहबंधनात अडकली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न झाला.

यावेळी मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीत आनंदाचं वातावरण पहायला मिळालं. डिसेंबर महिन्यात योगिता आणि अक्षयचा साखरपुडा झाला होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लग्नसोहळ्यात खास काळजी घेण्यात आली. सर्वच वऱ्हाडी मंडळींनी मास्क परिधान केला होता तसेच सॅनिटायझरचा वापरही करण्यात आला. सोशल डिस्टंन्सिंगचही यावेळी पालन करण्यात आलं. त्याचेच काही खास फोटो…

Leave a Comment