“ईव्हीएमवर टीका करणारे गप्प झाले” ; मोदींचा विरोधकांना खोचक टोला

Narendra Modi on EVM । राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) संसदीय पक्षाची बैठक आज सेंट्रल हॉलमध्ये पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची लोकसभेचे नेते, भाजपचे नेते आणि एनडीए संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व खासदारांचे अभिनंदन केला. तसेच त्यांच्या घटक पक्षाचे आभार मानले. दरम्यान. निवडणुकीत विरोधकांकडून ईव्हीएमवर आक्षेप घेण्यात येत होते. त्यांच्या या टीकेला नरेंद्र मोदी यांनी यावेळी उत्तर दिले.

ईव्हीएमवर टीका करणारे गप्प झाले Narendra Modi on EVM । 

आपलं विकसित भारताचं स्वप्न आहे. येणाऱ्या 25 वर्षांत महाप्रभू जगन्नाथ यांच्या आशीर्वादाने ओदिशा या राज्याचे देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान असेल. चार जून रोजी निकाल लागला. मी माझ्या कामात व्यग्र होतो. पण मी एका माझ्या सहकाऱ्याला विचारलं की देशात ईव्हीएम जिंवत आहे का, की ईव्हीएम मरून गेले आहे. भारताच्या लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास उडावा यासाठी विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आला. विरोधक ईव्हीएम मशीवर टीका करायचे. पण 4 जून रोजी संध्याकाळपर्यंत ईव्हीएमने विरोधकांना गप्प केले. हीच भारताच्या लोकशाहीची, निवडणूक आयोगाची ताकद आहे.

2019 साली ते पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनला घेऊन टीका करायाला सुरुवात करतील. निवडणुकीच्या काळात प्रत्येक तीन दिवसांनी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा यावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळा कसा आणता येईल, यासाठी प्रयत्न केले. निवडणूक आयोगावर आरोप करायचा, निकाल काहीही लागूदेत भारताची जगात बदनामी करायची, असा विरोधकांनी कट रचला होता. देश त्यांना कधीही माफ करणार नाही.

निवडणुकीत लोकांचं विभाजन करण्याचा प्रयत्न मोदी Narendra Modi on EVM ।
इंडिया आघाडी तंत्रज्ञान, विकासाच्या विरोधक आहे. मी जगात सांगतो की आम्ही जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहोत. पण हे जगात जाऊन सांगतात की भारतात लोकशाही नाही. या निकालामुळे भारताची विशालता, व्यापकता जाणून घेण्यासाठी जग आकर्षित होणार आहे.

निवडणुकीच्या काळात हिंसा भडकावण्याचा प्रयत्न करण्यात केला. देशात लोकांना विभाजित करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीच्या काळात लोकांना जोडण्याचा प्रयत्न करायचा असतो पण त्यांनी लोकांना विभाजित केलं. यावेळच्या निवडणुकीत एनडीएचा महाविजय झाला आहे. निकालानंतर एनडीएचा पराभव झाला आहे, असं चित्र निर्माण करण्यात आलं. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून विरोधकांना तसं चित्र निर्माण करावंल लागलं.