नरेंद्र मोदी की नाना पाटेकर… उत्कृष्ट कलाकार कोण? रोहित पवार म्हणतात,”या दोन ऑप्शनवरून…”

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. रोहित पवार हे कर्जत जामखेडचे नेतृत्व करत असले तरी संपूर्ण राज्यभर त्यांचे राजकीय फॉलोविंग आहे. कर्जत जामखेडचे निवडणुकीदरम्यान रोहित पवार यांनी वापरलेली प्रचार यंत्रणा आजही राष्ट्रवादी पक्षामध्ये चर्चेचा विषय असतो. नुकतच रोहित पवार यांनी आपल्या ट्विटरवर आस्क रोहित पवार (AskRohitPawar) ही मोहीम राबवली. ज्याला तरुणाईसह अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.

यावेळी रोहित पवार यांनी युजरर्सच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यामध्ये अनेकांनी राजकारणाशी संबंधित प्रश्न विचारले तर काहींनी खाजगी गोष्टीसाठी देखील सल्ला मागितला. यावेळी एका युजरने रोहित पवारांना थेट उत्कृष्ट कलाकार कोण ? नरेंद्र मोदी की नाना पाटेकर असा सवाल विचारला. रोहित पवार यांनी या युजरच्या प्रश्नावर भन्नाट उत्तर दिले.

उत्कृष्ट कलाकाराच्या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले,”या दोन ऑप्शनवरून तुम्हाला राजकारणाबद्दल आणि अक्टिंगबद्दल बरच कळतं असं दिसतंय.. उत्तर तुम्हालाही माहिती आहे आणि लोकांनाही कळलंय..” रोहित पवार यांच्या उत्तरावर अनेकांनी प्रतिक्रिया देत त्यांचे अभिनंदन केले आहे.

रोहित पवार सध्या राष्ट्रवादीतील तरुण नेत्यांपैकी एक आहे. त्यामुळे तरुणाईशी कनेक्ट होण्यासाठी ते सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. आस्क रोहित पवार या महीमेअंतर्गत महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील व्यक्तींनी यावेळी रोहित पवार यांना प्रश्न विचारल्याचे दिसून आले. यामध्ये क्रीडा,राजकारण यासह मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश होता.