राष्ट्रीय हातमाग दिन विशेष : भारतीय सेलिब्रेटींच्या लाडक्या हॅन्डलूमची विदेशातही धूम !

राष्ट्रीय हातमाग दिन दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी देशभरात साजरा केला जातो. 1905 मध्ये स्वदेशी चळवळ सुरू झाली त्या दिवशी ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ साजरा करण्याची सुरुवात झाली. 

हा दिवस साजरा करण्याचा उद्देश स्वदेशी उद्योग आणि हातमाग (हॅन्डलूम) हस्तकला यांना प्रोत्साहन देणे आहे, जेणेकरून देशाच्या आर्थिक विकासात मदत होऊ शकेल. त्याचबरोबर हातांची कारागिरीही देशाचा अभिमानी सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करते. हातमाग विणकर आणि कामगारांमध्ये 70% पेक्षा जास्त महिला आहेत. या पार्श्वभूमीवर हातमाग उद्योग महिला सक्षमीकरणाची गुरुकिल्ली म्हणून देखील ओळखले जाते.

पहिला राष्ट्रीय हातमाग दिन कधी साजरा केला गेला?
2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईमध्ये राष्ट्रीय हातमाग दिवसाचे आयोजन केले होते. 2021 मध्ये सातवा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जाईल. हा दिवस विणकर आणि उद्योगातील इतरांसाठी हस्तनिर्मित आणि हाताने विणलेल्या कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो.

हातमाग (हॅन्डलूम) म्हणजे काय?
तामिळनाडूच्या प्रसिद्ध कांचीपुरम साड्या असोत किंवा आसामच्या मुगा (सोनेरी रेशीम) मेखला सदोर, महाराष्ट्राच्या पैठणी विणकाम किंवा उत्तर प्रदेशातील बनारसी ब्रोकेड, भारतामध्ये जगातील सर्वात मोठा आणि व्यापक विणकाम उद्योग आहे. केवळ देशातच नाही, तर या अस्सल हातमागावरील देशी कपड्यांची मागणी परदेशातही खूप जास्त आहे. अगदी अनेक चित्रपट कलाकार आणि मोठे डिझायनर सुद्धा हातमाग कामाला खूप प्रोत्साहन देतात.

हातमाग कपड्यांची वैशिष्ट्ये
कारखान्यांमध्ये कापड विणण्यासाठी एक यंत्रमाग (मशीन) असते, जे हाताने चालवले जाते. त्यापासून बनवलेल्या कापडाला हातमाग म्हणतात. हातमाग कापड मऊ, बारीक आणि रंगीत असतात, ज्यात कापूस आणि कृत्रिम धाग्यांचे मिश्रण असते. हातमागचे कपडे साधारणपणे स्वस्त असतात.

राष्ट्रीय हातमाग दिन 2021 थीम
राष्ट्रीय हातमाग दिन 2021 ची थीम “हातमाग – एक भारतीय वारसा” ही आहे. वर्तमानाबद्दल बोलायचे झाले तर सध्या 150 प्रशिक्षित महिला आणि पुरुष विणकर आहेत. हाताने विणलेले कापड भारताच्या प्रत्येक काना-कोपऱ्यात विकले जातात, ज्यामुळे या उद्योगात वार्षिक 49 लाख रुपयांची उलाढाल होते. या कापडांची रंगाई इतकी उत्कृष्ट असते की ती वर्षानुवर्षे चमकदार राहते.

कोरोनाच्या काळात आर्थिक संकट अधिक गडद
वर्षभर हातमागचे कपडे म्हणजे साड्या, कुर्ते, शर्ट, पायजमा, रुमाल, शाल, दरी इत्यादींना खूप मागणी असते, पण कोरोनाच्या संकटकाळामुळे विणकरांना काम मिळणे कठीण झाले. कोरोना काळात काम बंद केल्यामुळे विणकरांना गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले.