नवरात्रीसाठी किसान कनेक्‍टची नवरंग फळे बास्केट

पुणे, दि.19-यावर्षीचा नवरात्रोत्सव करोनाच्या छायेखाली घरबसल्याच होत असताना करोनाशी लढताना भक्‍तीबरोबरच शारीरिक शक्‍तीलाही महत्त्व दिले आहे.यासाठी “किसान कनेक्‍ट’ या ऑनलाइन पद्धतीने ‘शेतातून थेट दारी’ या संकल्पनेतून भाजीपाला व फळे पुरवठा करणाऱ्या मंचातील शेतकरीबंधूंनी उत्सवाच्या नऊ दिवसांसाठी विविध प्रकारच्या नऊ रंगांच्या फळांचे नैवेद्य व प्रसादासाठीचे अनोखे बास्केट्‌स उपलब्ध केले आहेत.

यांत नऊ रंगांची वुडन सफरचंद, संत्री, सफेद ड्रॅगन फ्रुट, जर्द लाल रंगाची सफरचंदे, ब्ल्युबेरी, केळी, हिरवी किवीज्‌, जांभळ्या रंगाचे प्लम्स आणि हिरवी सफरचंदे आहेत. फळांबरोबरच उपवासाचे रताळी, साबुदाणा, भगर, बटाटे आदी उपलब्ध होतील. याखेरीज, हे शेतकरी प्रतिकारशक्‍ती वाढविणारे ‘ईम्युनिटी बास्केट्‌स’ पुरवित आहेत. किसान कनेक्‍टचे मुंबई, ठाणे व पुणे, अहमदनगर व पुणे जिल्ह्याचे शेतकरी शेतातून ताजा माल थेट ग्राहकांना पोहोचवितात.

Leave a Comment