नयनताराने मागितली ‘माफी’

Nayanthara – साऊथ अभिनेत्री नयनतारा सध्या तिच्या अन्नपूर्णी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटातील एक सिनमध्ये भगवान श्री राम मांसाहार करतात असे दाखविण्यात आले आहे. या चित्रपटातील या सिनमुळे इतका वाद झाला की शेवटी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिसवरून काढण्यात आला. या चित्रपटाच्या रिलीज नंतर एफआयआर दाखल करण्यात आली. धार्मिक भावना दुखवल्याच्या आरोपानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. तिने पोस्टमध्ये सांगितले आहे की,’मी स्वःताह मंदिरात जाते. मी देवावर आस्था ठेवते, जे काही घडले ते नकळत घडले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by N A Y A N T H A R A (@nayanthara)

 

पोस्टमध्ये नयनताराने लिहिले आहे की,’ ओम आणि  जय श्री राम… मी ही पोस्ट जड मनाने आणि सत्यतेच्या आधारे लिहीत आहे. गेल्या काही  दिवसांपासून  अन्नपूर्णी चित्रपटातील सीनमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहे. या संदर्भात मी सर्व देशवासियांना संबोधित करणार आहे.

तिने पुढे लिहिले, कुठल्या चित्रपटाची निर्मिती हा फक आर्थिक लाभासाठी नसून या चित्रपटातील सर्व प्रेक्षकांना एक बोध देणे असतो. हेच अन्नपूर्णी चित्रपटासाठी सुद्धा लागू होते. हा चित्रपट बनवताना या संबंधित त्याच्याशी निगडित भावना आणि मेहनत एका निरागस मनाने केली आहे, या चित्रपटाच्या उद्देश जीवनाचा प्रवास प्रतिबिंबित करणे आणि प्रबळ इच्छाशक्तीने अडथळ्यांवर मात करणे.

आम्हाला प्रामाणिकपणे या चित्रपटाच्या माध्यमांतून एक सकारात्मक मेसेज सर्वांपर्यंत पोहचवायचा होता. मात्र नकळतपणे या चित्रपटाच्या माध्यमातून अनेकांच्या भावना दुखावल्या आहे.  कोणाच्याही भावना किंवा श्रद्धा दुखावण्याचा माझा आणि माझ्या टीमचा हेतू नव्हता. असं म्हणत या पोस्टच्या माध्यमांतून तिने माफी मागितली आहे.

———