ncome Tax Notice : कर कपात केल्यानंतरही मिळू शकते नोटीस ; आयकरदात्यांसाठी महत्वाची माहिती

ncome Tax Notice : आयकर विभागाकडून करदात्यांसाठी एक नवीन अपडेट समोर आले आहे. येत्या काही दिवसांत विभागाकडून लवकरच अनेक आयकरदात्यांना नोटिसा पाठवल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार आयकर विभागाने नोटीस पाठवण्याची तयारी सुरु केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

समोर आलेल्या अहवालानुसार, विभाग त्या करदात्यांना नोटीस देखील पाठवू शकतो ज्यांचे कर आधीच कापले गेले आहेत. अहवालात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष नितीन गुप्ता यांचा हवाला देत आयकर विभाग करविषयक वाद कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. सध्या केवळ अशाच करदात्यांना प्राप्तिकराकडून नोटीस मिळणार आहेत, ज्यांच्याबाबत विभागाकडे काही ठोस माहिती आहे.

अर्थसंकल्पात कर विवादांवर घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या महिन्यात 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर विवाद कमी करण्यासाठी नवीन उपक्रमाची घोषणा केली होती. 2009-10 या आर्थिक वर्षापर्यंतची 25 हजार रुपयांपर्यंतची कर मागणीची थकबाकी रद्द केली जाईल, असे त्यांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे 2010-11 ते 2014-15 या कालावधीतील 10,000 रुपयांपर्यंतच्या कर थकबाकीची प्रकरणेही निकाली काढण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी करदात्यांना याचा फायदा होऊ शकतो,  असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

कर्नाटकात विशेष केंद्र तयार 
आयकर विभागाने कर विवादांसाठी कर्नाटकातील म्हैसूर येथे मागणी व्यवस्थापन केंद्र स्थापन केले आहे. CBDT चेअरमन यांनी,”आधी म्हैसूर स्थित केंद्र फक्त कर्नाटकची प्रकरणे हाताळत होते, परंतु आता केंद्र संपूर्ण देशाची प्रकरणे हाताळत आहे. हे केंद्र 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर विवाद प्रकरणे हाताळते.” असे म्हटले आहे.

‘त्यांनाच’ नोटीस मिळणार आहे
प्राप्तिकर विभागाच्या ताज्या अपडेटमध्ये, त्या करदात्यांना नोटीस मिळणार आहे, ज्यांचा TDS म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स कापला गेला आहे, परंतु ITR दाखल केलेला नाही. मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत संपली आहे. ITR भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 पर्यंत होती. त्यानंतर उशीर झालेला ITR भरण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत होती.