एकेकाळी ‘या’ गंभीर आजाराशी लढत होती नेहा कक्कर, एंग्जायटीचीही ठरली बळी

मुंबई – प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचे प्रत्येक गाणे लोकांच्या पसंतीस पडले आहे. नेहा ही देशातील सर्वाधिक फॉलो केली जाणारी गायिका आहे. पण इथपर्यंत मोठ्या संकटाचा सामना करत नेहा पोहचली आहे. मोठ्या आव्हानांना तोंड देत गायकेने आज हे यश मिळवले आहे. एकेकाळी नेहा अशा आजाराची शिकार झाली होती, ज्याबद्दल जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल.

नेहाने गेल्या वर्षी खुलासा केला होता ज्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. तिने सांगितले होते की, ती एंग्जायटीची शिकार होती आणि त्याच वेळी तिला थायरॉईड होता. सिंगरने सांगितले की, इतर लोकांप्रमाणेच त्यांनाही चिंता आणि तणावाच्या समस्येचा सामना करावा लागला आहे. या सर्व आजारावर नेहाने मात करत तिने उंच शिखर गाठले आहे. नेहाच्या आवाजाने सर्वांनाच भूरळ घातली आहे.

दरम्यान, नेहा कक्कर नुकतेच तिचे नवीन गाणे ‘ला ला ला’ घेऊन आली आहे. या व्हिडिओ गाण्यात तिच्यासोबत पती रोहनप्रीतनेही काम केले आहे. दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिल्याचे दिसून आले आहे.