Neha Pendse : नेहा पेंडसे ओटीटीवर करणार पदार्पण?

Neha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसेने मालिकासह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आपल्या अभिनय आणि डान्स शैलीच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेमुळे नेहाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेनंतर आता नेहा पेंडसे ओटीटीवर झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे.

लवकरच नेहा ओटीटी क्षेत्रामध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे. नेहा लवकरच डिजिटल विश्वात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर तिच्या ओटीटी डेब्यूची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मात्र ती कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार ? कोणत्या भूमिकेत दिसणार? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, नेहा पेंडसेने हिंदी, मराठीसह तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. हिंदीतील प्रसिद्ध ‘मे आय कम इन मॅडम’ आणि ‘भाभीजी घर पर है’ या मालिकांमध्ये नेहा झळकली होती. यानंतर, ती 2018 मध्ये ‘बिग बॉस शो’ मध्ये दिसली होती. 2011 मध्ये झी मराठीवर टेलिकास्ट झालेल्या ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेतही तिने प्रमुख भूमिका केली होती.

नेहा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. ती नेहमीची आपले हॉट अँड ग्लॅमर्स फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत अनेकांचे लक्ष वेधून घेते.