भारत-अ संघाचे ‘या’ नवोदित खेळाडूकडे नेतृत्व सोपवण्यात येणार

मुंबई – भारतीय संघाचा नवोदित स्टार फलंदाज शुभमन गिल याच्याकडे ‘अ’ संघाचे नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याचे संकेत बीसीसीआयकडून मिळाले आहेत. पुढील महिन्यात भारताचा ‘अ’ संघ न्यूझीलंडच्या ‘अ’ संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी गिलकडे भविष्यातील कर्णधार म्हणून नेतृत्व सोपवण्यात येणार आहे.

गिलने वेस्ट इंडिज व त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे निवड समितीही प्रभावित झाली असून त्याच्याकडे नेतृत्वगुण असल्याचेही निवड समितीने म्हटले आहे. तसेच या मालिकेसाठी शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि महंमद सिराज यांचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो.

या मालिकेतील तीन सामने बेंगळुरुत तर तीन सामने चेन्नईत होणार आहेत. या मालिकेसाठी संघात परतलेला वॉशिंग्टन सुंदर यालाही आपली कामगिरी व तंदुरुस्ती सिद्ध करता येणार आहे. तसेच मुंबईचा डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलानी यालाही संधी मिळू शकते. तसेच आयपीएल स्टार रजत पाटीदारलाही संघात स्थान दिले जाऊ शकते.