ड्रग्जचा नवा प्रकार; ‘एमडीएमए’ वितरकांचे पाळेमुळे खोलवर

मेडिकल, इंजिनिअरिंचे विद्यार्थी ठरतात “गिऱ्हाईक’


संजय कडू
पुणेअंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या जगातएमडीएमएनावाच्या ड्रग्जने पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे. उच्च शिक्षण घेणारे श्रीमंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या नशेच्या जाळ्यात सापडत असून, त्यामुळे नव्या पिढीतीलक्रीमअसणारे बुद्धिमान या नशेच्या आहारी जाऊन बरबाद होण्याची भीती जाणत्या लोकांनी व्यक्त केली आहे. या नव्या ड्रग्जच्यासिंडिकेटबाबत पोलिसांकडे फारशी माहिती उपलब्ध नाही, ही चिंता वाढवणारी बाब आहे. अन्य अंमली पदार्थांप्रमाणे या पदार्थांचे पेडलर आणि त्यांचे सप्लायर यांची साखळी उघड होत नसल्याने याच्या मुळावर घाव घालणे शक् होत नाही. तरीही, त्यादृष्टीने आमची तपास यंत्रणा काम करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

 


ऍपवर ऑर्डर
पुणे पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने नुकत्याच केलेल्या कारवाईत प्रथमचएमडीएमएसाठा सापडला आहे. वैद्यकीय अभियांत्रिकी शिकणारे विद्यार्थी, मॉडेल्स आणि उच्चभ्रू व्यक्तींच्या पार्ट्यांमध्येएमडीएमएचा ट्रेंड वाढला आहे. विशेष म्हणजेएमडीएमएऍपद्वारे विकला जात आहे. या ऍपवर संपर्क साधल्यावरहोम डिलिव्हरीहोत असल्याची नवी बाजू प्रकाशझोतात आली आहे.

 


30
हजारांपर्यंत भाव

एक गोळी साधारणत: सहा ग्रॅमची असते. यामुळे नाकाबंदीत पेडलर पकडला गेला, तरी तो अंमलीपदार्थाची वाहतूक करतोय हे कळत नाही. एका टॅबलेटची किंमत दोन ते अडीच हजार असते. आयटीतील कर्मचारीही वीकेंड पार्टीमध्ये याचा सर्रास वापर करतात. पेडलर सहा गोळ्यांची एक स्ट्रीप घेऊन विक्रीसाठी फिरतात. एका स्ट्रीपची विक्री 24 ते 30 हजारांना होते.

 


गोळीचे स्वरूप
एमडीएमएहे पार्टी ड्रग्ज म्हणून ओळखले जाते. याची नशाहीएमडीकिंवाएलएसडीड्रग्जपेक्षा अधिक आहे. स्टेरॉइड सारखी नशाएमडीएमएने चढते. तर वैद्यकीय क्षेत्रात काही गंभीर आजारावर सीमोलेन टर्माइन इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन फुड ऍन्ड ड्रग्ज विभागाच्या परवान्याशिवाय विक्री केले जात नाही. मात्र, त्यातील काही घटकांचा वापर अन्य रसायनांबरोबर करूनएमडीएमएतयार करतात. हे गोळीच्या (टॅब्लेट) स्वरुपात उपलब्ध होते.

 


खऱ्या तस्करापर्यंत पोहोचणे कठीण
अंमलीपदार्थांची खरेदीविक्री ऑनलाइनही होते. साधारणत: “एमडीएमएची व्रिकी एका ऍपद्वारे होत आहे. पेडलरसुद्धा हे ऍप वापरतात. पेडलरपर्यंत अंमली पदार्थ पोहोचवणारा सातत्याने वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून संपर्कात असतो. तसेच भेटण्याचे ठिकाणही ऐनवेळी बदलले जाते. एकदा डिलिव्हरी केली, तर संबंधित मोबाइल नंबर बंद केला जातो. यामुळे पेडलरलाही विक्री करणाऱ्याबाबत काहीच माहिती मिळत नाही. यामुळे पोलिसांच्या हाती पेडलर लागले, तरी खऱ्या तस्करापर्यंत पोहोचता येत नाही अंमलीपदार्थांच्या बाजारात दिवसेंदिवस नवीन ड्रग्जचा ट्रेंड समोर येतो. जितकी जास्त नशा, तितकी जास्त किंमत हे गणितही ठरलेले असते. पारंपरिक गांजा, चरससोबत, एमडी, क्रिस्टल, एलएसडी अशा ड्रग्जची रेलचेल काळ्या बाजारात आहे. मात्र, आता नव्यानेएमडीएमएनावाचा अंमलीपदार्थ बाजारात दाखल झाला आहे. सध्या उच्चभ्रू नशेबाजांमध्ये त्याची चलती आहे.

 

अंमलीपदार्थविरोधी पथकाने प्रथमचएमडीएमएअंमलीपदार्थ काही दिवसांपूर्वी पकडला. ते विकणाऱ्या अनुभव पहाडे (27) या पेडलरला अटकही केली. तोएआरएआयमध्ये अभियंता असल्याचे सांगत आहे. “एमडीसारखाच हा जास्त नशा असलेला अंमली पदार्थ आहे.
प्रकाश खांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक

Leave a Comment