मोबाईल विक्री जोमात; महागाईचा परिणाम नाही

नवी दिल्ली – महागाई वाढली असली तरी त्याचा आमच्या मोबाईल विक्रीवर कसलाही परिणाम नसल्याचा दावा सॅमसंग कंपनीचे मोबाईल बिझनेस महाव्यवस्थापक अक्षय गुप्ता यांनी केला आहे.

ते म्हणाले की मोबाईल फोन ही आता गरजेची वस्तू झाल्यामुळे ग्राहक फोन खरेदी बाबत फारशी तडजोड करीत नाहीत. या कंपनीने नुकत्याच जारी केलेल्या गॅलक्‍सी झेड मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

ते म्हणाले की, पहिल्याच दिवशी हा फोन महाग असूनही 510 हजार ग्राहकांनी बुकिंग केली. सॅमसंग कंपनी मेक इन इंडियावर विश्वास ठेवते. त्यामुळे कंपनीचे बहुतांश मोबाईल हे भारतात तयार केले जातात. त्याचबरोबर संशोधन आणि विकासही भारतातच केला जातो असे त्यांनी सांगितले.