पेरिविंकलच्या विद्यार्थ्यांनी घेतले अनुभवातून शिक्षणाचे धडे; भातशेती करण्याचा घेतला अनुभव

सूस – चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेत शुक्रवार दि.२० जुलै रोजी इयत्ता 10वी व 12वी च्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता स्वतःच्या अनुभवातून शिक्षण देण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला.

नांदे-मौजे येथील शेतकरी-मळा या श्री विठ्ठल रानवडे -पाटील यांच्या शेतावर जाऊन पेरिविंकल च्या विद्यार्थी व शिक्षकांनी स्वतः भातशेती म्हणजेच(Rice Farming)करण्याचा अनुभव घेतला. पुस्तकातील अभ्यास तर रोजच विद्यार्थी शिकत असतात पण पुस्तका पलीकडे जाऊन असे प्रात्यक्षिक ज्ञान घेण्याचा एक प्रयत्न व त्यातून येणारा अनुभव व अनुभवातून मिळणारा आनंद आज पेरिविंकल च्या सूस शाखेतील विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाला.

आपल्या रोजच्या आहारात भात हा अविभाज्य भाग असून आपण तो रोजच खातो पण हा भात कसा व कुठून येतो, यासाठी शेतकरी शेतात कसे भाताच्या पिकांची लावणी करतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन भाताची लावणी पेरिविंकल च्या विद्यार्थ्यांनी व त्याचबरोबर शिक्षकांनी सुद्धा आज अनुभवली. रोज फळ्यावर शिकवत असलेल्या शिक्षकांनी देखील आज भातशेती चे प्रात्यक्षिक अनुभवले.

या भातशेतीच्या क्षेत्र भेटीचे (Field-Visit) चे आयोजन शाळेच्या वेळेतच स्कूल बस ने विद्यार्थ्यांना नेऊन करण्यात आले होते. या संपूर्ण Field-Trip चे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल सर व संचालिका रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पेरिविंकल शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने करण्यात आले होते. हेड ऑफ डिपार्टमेंट सचिन खोडके व शुभा कुलकर्णी यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकगण व विद्यार्थीवर्ग यांच्या मदतीने Field-Visit अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली. सर्वांनी भातशेती चा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मनमुराद आनंद लुटला व अनुभवातून शिक्षणाचा आस्वाद घेतला.