अभिनेत्री स्वरा भास्करला ममता बॅनर्जींनी दिली राजकारणात येण्याची ‘ऑफर’

मुंबई –  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  सध्या आपल्या पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी देशाच्या विविध भागाचा दौरा करीत आहेत. दोन दिवस त्या मुंबई दौऱ्यावर होत्या. यावेळी त्या  एका जाहीर कार्यक्रमाला  उपस्थित असून  या कार्यक्रमात  सामाजिक कार्यकर्ते, हायकोर्टाचे माजी न्यायाधीश आणि सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी ममता बॅनर्जी यांनी अभिनेत्री स्वरा भास्करला  राजकारणात का येत नाहीत, अशी विचारणा केली.

कार्यक्रमादरम्यान, स्वरा भास्करने आपली मते  मांडली. यावर ममता बॅनर्जी यांनी अभिनेत्री स्वरा भास्करला तुम्ही राजकारणात का येत नाहीत, अशी विचारणा केली. सध्या या घटनेचा व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल आला आहे. बॉलीवूड सेलेब्स आता राजकारणात एंट्री घेणार का ? स्वरा भास्कर राजकारणात उतरणार का ? असेही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला, असा मोठा आरोप करत, भाजप हा क्रूर आणि अलोकतांत्रिक पक्ष असल्याची बोचरी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली.