इंग्रजी बोलतो म्हणजे खूप शहाणा….; सुजय विखेंच्या आव्हानावर शरद पवारांची जोरदार टीका

Nilesh Lanke । Sujay Vikhe Patil । Shard Pawar : दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी शरद पवार गटाकडून निलेश लंके आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंनी रणशिंग फुंकले आहे.

काही दिवसांपूर्वी सुजय विखेंनी निलेश लंके यांच्यावर टीका करताना त्यांचे शिक्षण काढलं होतं. निलेश लंकेंनी पाठांतर करून का होईना, माझ्याएवढं इंग्रजी बोलावं, मी नगरमधून उमेदवारी अर्ज मागे घेईन असं आव्हान सुजय विखेंनी दिलं होतं.

त्यानंतर या आव्हानाला नीलेश लंकेंचं जोरदार प्रत्युत्तर दिल होत. ‘सुजय विखे हे श्रीमंत कुटुंबातील आहेत, ते माझ्यासारख्या गरीब उमेदवाराची अशाच पद्धतीने टिंगल करतील, ही त्यांच्याकडे असलेल्या पैशाची मस्ती आहे’ असं प्रत्युत्तर निलेश लंके यांनी दिलं होत.

मात्र, आता प्रकरणावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत शरद पवारांनी सुजय विखेंवर बोचरी टीका केली आहे.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “मी इंग्रजी बोलतो म्हणजे मी खूप शहाणा झालो असं नाही, तुमचं इंग्रजी तुम्हाला लाखलाभ असो, असे बोचरी टीका त्यांनी केली आहे.

तसेच, नगरमध्ये मंडळी सांगतात 50 वर्ष आम्ही लोकांची सेवा करतो. पण त्यांच्या पहिल्या पिढीने काम केलं नंतरच्या पिढीने काय केलं? अशी टीका त्यांनी यावेळी विखे पाटलांवर केली आहे.

राहुरी कारखान्यावर राज्यभरातील मंत्रिमंडळातील अनेक लोक येऊन गेले. कारण सहकारातील उत्तम कारखाना कसा आहे तो पाहण्यासाठी मोठे नेते यायचे पण याच कारखान्याची विखेंनी काय वाट लावली हे मी सांगू इच्छित नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

सुजय विखे नेमकं काय म्हणाले?

नगरचे भाजप उमेदवार सुजय विखेंनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर टीका करताना त्यांचे शिक्षण काढलं होतं. निलेश लंकेंनी पाठांतर करून का होईना, माझ्याएवढं इंग्रजी बोलावं, मी नगरमधून उमेदवारी अर्ज मागे घेईन असं आव्हान सुजय विखेंनी दिलं होतं. सुजय विखेंच्या या आव्हानावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली.