निलेश लंकेंबाबत अजित पवार म्हणाले,’शरद पवार गटात जाणार अशी चर्चा..’

Nilesh Lanke। राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटात सामिल झालेले अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच अजित पवार गटाला धक्का बसला आहे. निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते

सोमवारी पुण्यात शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचवेळी लंके प्रवेश करतील, असं सांगितलं जात होत. निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून अजित पवारांचे विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. दक्षिण अहमदनगरमधून ते लोकसभेसाठी इच्छुक होते. पण अजित पवार गटाला तीन ते चारच जागा मिळण्याच्या चर्चेमुळे त्यांची अडचण झाली होती.  पण पुन्हा एकदा शरद पवारांची साथ दिल्यानंतर ते लोकसभेचे उमेदवार होण्याची  शक्यता असल्याची  चर्चा रंगली आहे. या चर्चांवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली केली आहे

Nilesh Lanke। नेमकं काय म्हणाले अजित पवार

‘निलेश लंकेबाबत सुरु असलेल्या चर्चांबाबत काही तथ्य नाही. आम्ही कोणी चर्चा केली नाही, शरद पवार गटात जाणार अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे. पण त्यात अजिबात तथ्य नाहीय असं अजित पवार म्हणाले.’

हे वाचालं का ?

अमरावतीतून निवडणूक लढवणार? सुजात आंबेडकर दिलं उत्तर; म्हणाले,’माझ्या उमेदवारीचा…’
अखेर ठरलं तर…! जालन्यातून मंत्री रावसाहेब दानवे तर नागपुर अन् बीडमधून ‘या’ नेत्यांची उमेदवारी फिक्स ?