पुणे जिल्हा | निर्मिती मुर्‍हेने पटकाविले कांस्यपदक

चिंबळी, (वार्ताहर) – ऑलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कुरुळी (मुर्‍हेवस्ती) येथील जोग महाराज व्यायाम शाळेतील पै. निर्मिती नारायण मुर्‍हे हिने पिंपरी-चिंचवड संघाकडून खेळून कांस्यपदक पटकविले आहे.

क्रीडा युवा संचनालय महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या वतीने उदगीर (लातूर) येथे या स्पर्धा पार पडल्या होत्या. यात निर्मितीने कांस्यपदक पटकविल्याने बाजार समितीचे संचालक सागर मुर्‍हे,

माजी संचालक पांडुरंग बनकर, उपसरपंच दीपक डोंगरे, दीपक मुर्‍हे, विशाल सोनवणे, गुलाब सोनवणे, मारूती मुर्‍हे, नितीन गायकवाड, रामनाथ सोनवणे, नाना जैद आदींनी अभिनंद केले आहे.