पुणे जिल्हा | महाळुंगे इंगळेच्या उपसरपंच पदी नितीन फलके

महाळुंगे इंगळे, (वार्ताहर)- नितीन फलके यांची महाळुंगे इंगळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. महाळुंगे इंगळे येथील उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच तथा अध्यासी अधिकारी अर्चना मुकुंद महाळुंगकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 एप्रिल रोजी घेण्यात आली. विश्वनाथ महाळुंगकर यांनी त्यांच्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

उपसरपंच पदासाठी नितीन तानाजी फलके व किशोर विष्णू भालेराव यांचे नामनिर्देशक पत्र दाखल झाले होते. किशोर भालेराव यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने नितीन फलके यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी यांनी जाहीर केले.

सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी बी. बी. गोरे यांनी काम पाहिले. यावेळी शेखर तुपे, विश्वनाथ महाळुंगकर, किशोर भालेराव, ऋषिकेश मिंडे, मयुरी महाळुंगकर, बेबीताई मेंगळे, वैशाली महाळुंगकर उपस्थित होते.