पिंपरी | पवन मावळ युवा मोर्चा अध्यक्षपदी नितीन लायगुडे

पवनानगर, (वार्ताहर) – आजिवली – जोवन गावचे माजी सरपंच नितीन लायगुडे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पवन मावळच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड मावळ तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष नितीन मराठे यांनी केली. नियुक्ती पत्र माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे यांच्या हस्ते देण्यात आले.

या वेळी माजी मंत्री बाळा भेगडे, खासदार मेघा कुलकर्णी, पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा महाराष्ट्र गणेश भेगडे, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, तालुका अध्यक्ष दत्ता गुंड, युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे, माजी उपसभापती शांताराम कदम, माजी सभापती निकिता घोटकुले आदी उपस्थित होते.

निवडी नंतर लायगुडे म्हणाले की, माझ्यावर दिलेली ही जबाबदारी, मी यासाठी पूर्ण ताकदीने काम करून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करेन. पवन मावळ तसेच मावळ तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांना भाजपाच्या विचारा सोबत जोडून संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.