चहा-बिस्किट नाही म्हणून डॉक्‍टरने शस्रक्रिया सोडली; नागपूरमधील धक्कादायक प्रकार

Nagpur – चहा-बिस्किट मिळाले नाही म्हणून डॉक्‍टरांनी ऑपरेशन न केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये घडला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यानंतर संबंधित महिलांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वरिष्ठांनी दुसऱ्या डॉक्‍टरांची व्यवस्था केली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी चौकशी करण्याचे मौखिक आदेश दिले आहे.

यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती तीन दिवसात अहवाल सादर करणार आहे. नागपूरच्या मौदा तालुक्‍यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

डॉक्‍टर 3 नोव्हेंबर रोजी कुटुंबनियोजनासाठी आठ महिलांवर शस्त्रक्रिया करणार होते. यातील चार महिलांवर डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया केली. यानंतर चार महिलांना भूल दिल्यानंतर शस्रक्रियेच्या वेळी डॉक्‍टरांनी नकार दिला.

या मागचे कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल की, डॉक्‍टराला चहा-बिस्किट मिळाले नाही म्हणून शस्रक्रियेस नकार देउन निघून गेल्याची माहिती मिळाली. या डॉक्‍टरांचे नाव डॉ. तेजराम भलावे असे आहे.

डॉक्‍टराने दिले स्पष्टीकरण…
या प्रकरणी डॉ. डॉ. तेजराम भलावेंनी स्पष्टीकरण देत म्हणाले, आपल्याला मधुमेह असून वेळेवर चहा बिस्किटे लागतात. ती मिळाली नाही तर रक्तातील साखरेचे प्रमाण खालावते आणि रक्तदाबही खालावला. यामुळे तेथून निघावे लागले, असे स्पष्टीकरण डॉक्‍टरांनी वरिष्ठांना दिल्याची माहिती मिळते.