रात्री चांगली झोप मिळत नाही? प्या ‘हे’ ड्रिंक !

पुणे – झोप आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पुरेशी झोप झाली नाही तर आपल्या आरोग्याचे अनेक प्रश्‍न उभे राहतात. रात्रीची झोप तर आवश्‍यकच असते, पण जर तुम्हाला रात्रीची पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. रात्रीची आवश्यक झोप न मिळाल्यास कित्येक गंभीर आजारांना आयते निमंत्रण मिळते.

दरम्यान, या समस्येतून सुटका मिळवायची असल्यास एक खास पेय झोपण्यापूर्वी प्यायल्यास तुम्हाला झोप येण्यास मदत मिळेल. हे पेय झोपताना 15 मिनिटांपूर्वी प्यावे. यानंतर काही वेळानं तुम्हाला नक्कीच चांगली झोप येईल.

डर्टी लेमन ड्रिंक : ‘डर्टी लेमन ड्रिंक’ असं या पेयाचं नाव आहे. बऱ्याच जणांनी या पेयाचं नाव ऐकलेही असेल. या ड्रिंकमध्ये लिंबू रसाव्यतिरिक्त अन्य सामग्रीचाही वापर केला जातो. ‘डर्टी लेमन ड्रिंक’ मध्ये पाणी, ताज्या हळदीची पेस्ट, गुलाब पाणी आणि कॅमोमाईलचं फुलाचा वापर केला जातो. या साम्रगीचं मिश्रण करून हे ड्रिंक तयार केलं जातं.

या ड्रिंकमध्ये लिंबूच्या रसाचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्यास मदत होते आणि तुम्हाला चांगली झोप देखील येते. या रण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीमध्ये कित्येक औषधी गुणधर्म आहेत.

 

 

Leave a Comment