रुग्णालयाचा हलगर्जीपणा; सलाईनच्या बाटलीत निघालं झुरळ

सोलापूर- सलाईनच्या बाटलीत झुरळ निघाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील बार्शीमधील एका रुग्णालयात समोर आली आहे. या घटनेने रुग्णालयाचा हलगर्जीपणा समोरे आला असून शहरात खळबळ उडाली आहे.

बार्शीतील रुग्णालयात तीन वर्षीय मुलाला ब्राॅकायटीस आणि निमोनियाचा त्रास होत असल्याने 27 ऑगस्टला दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. सलाईन लावण्यात आले. मात्र त्यातील सलाईन ठराविक कालावधीनंतर बंद पडत होता. सलाईनची तपासणी केली असता त्यात चक्क झुरळ असल्याचे दिसून आले. त्यानंतर तात्काळ सलाईन बंद करून रुग्णाच्या जीवाला होणारा धोका टळला. मात्र, याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

दरम्यान, रुग्णांच्या आरोग्यासोबत होणारी हेळसांड कधी थांबणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. सध्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून मुलीची तब्बेत व्यवस्थित आहे.