Odisha Train Accident – ‘विरोधक तुमच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत’… या प्रश्नावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले,’मी…’

Odisha Train Accident – ओडिशातील बालासोर येथे रेल्वे अपघात झाला आहे. येथे कोरोमंडल एक्सप्रेस अपघातात मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत  २८८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे आणि सुमारे ९00 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातातील गंभीर जखमी झालेले लोक जीवन मरणाशी झुंज देत आहे. 

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी झालेल्या अपघातानंतर  पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आतापर्यंतच्या बचाव कार्याची माहिती घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर पीएम मोदी ओडिशातील अपघातस्थळी भेट देणार आहे.  

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही घटनास्थळी पोहोचले असून सर्व अधिकाऱ्यांकडून अपघाताची माहिती घेत आहेत. यावेळी पत्रकरांनी विरोधक तुमच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. असा प्रश विचारला असता रेल्वेमंत्री  अश्विनी वैष्णव  म्हणाले,’या प्रकारच्या घटनेत मानवी संवेदनशीलता खूप महत्त्वाची आहे. मी प्रथम लक्ष बचाव आणि मदत यावर लक्ष देणार आहे.’ असं म्हणत यांनी आपल मत सांगितलं आहे.  

घटनास्थळाचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेल्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना या अपघातामागे षडयंत्र असू शकते का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीनंतरच याबाबत काही सांगता येईल, असे सांगितले.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, ‘अपघाताच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे, जी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल. सध्या संपूर्ण लक्ष बचावावर आहे. जखमींवर चांगल्या उपचारासाठी पथके जमा झाली आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनाही अपघाताची चौकशी करण्यास सांगितले आहे.’