अरे बापरे.! तुमच्या स्मार्टवॉचमध्ये आहेत टॉयलेट सीटपेक्षाही जास्त बॅक्टेरिया? नवीन संशोधनाने केले आश्चर्यचकित

पुणे – स्मार्टफोननंतर आता स्मार्टवॉच हे प्रमुख गॅझेट बनले आहे. स्मार्टवॉच बाजारात सध्या 1,000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. एका अंदाजानुसार, आज जवळपास प्रत्येकाकडेच स्मार्टफोन आहे आणि त्याच्याकडे स्मार्टवॉच देखील आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की तुमच्या स्मार्टवॉचचे ब्रेसलेट किंवा पट्टा किंवा बँड टॉयलेट सीटपेक्षाही अस्वच्छ आहे. एका नव्या संशोधन अहवालात ही बाब समोर आली आहे.

फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटी (FAU) ने केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की लोकांचे फोन तर अस्वच्छ राहतातच आणि आता स्मार्टवॉचच्या अस्वच्छतेबाबत एक गंभीर समस्या समोर आली आहे. या संशोधनानुसार, बहुतेक जीवाणू प्लास्टिक, रबर, कापड, चामडे, सोने आणि चांदीच्या स्मार्टवॉचच्या पट्ट्याखाली वाढत आहेत. या संशोधनादरम्यान अनेक मोठ्या ब्रँडच्या स्मार्टवॉचचा पट्टा समाविष्ट करण्यात आला.

संशोधनात समाविष्ट असलेल्या सुमारे 85 टक्के स्ट्रॅन्समध्ये स्टॅफिलोकोकस एसपीपी(Staphylococcus spp) बॅक्टेरिया असल्याचे आढळून आले, जे संसर्ग पसरवण्यासाठी जबाबदार आहेत. त्याच वेळी, ई. कोलाय (E. coli) बॅक्टेरिया 60 टक्के आणि अत्यंत धोकादायक स्यूडोमोनास एसपीपी (Pseudomonas spp) जीवाणू 30 टक्के आढळले आहेत. जिममध्ये किंवा पार्कमध्ये कोणत्याही वर्कआउटचा तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम होणार नाही, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.