अरे बापरे ! जगातील सर्वात लठ्ठ महिलेने केले तब्बल 200 किलो वजन कमी; वाचा थक्क करणारा प्रवास

मिसिसिपी : जगातील सर्वात लठ्ठ महिलेने तब्बल 200 किलो वजन कमी करत सर्वांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. अमेरिकेच्या मिसिसिपी येथील क्रिस्टीना फिलिप्स या लठ्ठ महिलेने तिच्या वजनाच्याचक्क दोन तृतियांश वजन कमी केले असल्याचे सांगण्यात येत  आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

क्रिस्टीना फिलिप्सचे वजन एकेकाळी 317.515 किलो इतकं झाले होते. लठ्ठपणामुळे तिला दोन वर्ष घराबाहेरही पडता आले नव्हते. 2012 मध्ये क्रिस्चीना फक्त 20 वर्षांची होती, तेव्हा तिचे वजन 600 पाऊंड म्हणजे 272 किलोच्या पुढे गेले होते. यावेळी क्रिस्टीना फिलिप्स तिच्या लठ्ठपणामुळे ‘My 600-lb Life’ या टीव्ही सीरीजमध्येही झळकली होती.

क्रिस्टीना फिलिप्सचे वजन वाढतच चालले होते. क्रिस्टीनावर गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रियाही करण्यात आली. डॉक्टरांनी तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. क्रिस्टीनाला चिंता होती की, लठ्ठपणामुळे तिला अपंगत्व येईल. लठ्ठपणामुळे तिला शारीरिकचं नाही तर अनेक मानसिक समस्यांना ही सामोरं जावं लागत होतं. तिला लठ्ठपणामुळे दोन पावलं चालणं आणि श्वास घेणंही कठीण झालं होतं.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्याअहवालानुसार, अमेरिकन टीव्ही सीरिजच्या प्रोड्युसरला सांगितले होते की, ती या शरीरामध्ये अडकली आहे. तिला या शरीरातून बाहेर पडायचं आहे. लठ्ठपणामुळे ती घरबाहेरही पडू शकत नाही. इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, जगातील लठ्ठ महिला क्रिस्टिनाने आता तिच्या वजनाच्या दोन तृतियांश वजन कमी केले आहे.