ओम फट स्वाहा !!! तात्या विंचू पुन्हा येतोय !!! नव्या सिनेमाचे पोस्टर रिलीज

Adinath Kothare New Film|  ‘झपाटलेला’ हा  मराठी सिनेमा सुपरहिट ठरला होता. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जादू आजही कायम आहे. यातील मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. लक्ष्मीकांत बर्डे यांच्यासह दिग्दर्शक महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. 2013 मध्ये ‘झपाटलेला-२’ प्रदर्शित झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा झपाटलेला चित्रपट एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

‘झपाटलेला- मी तात्या विंचू’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकतेच याचं पहिल पोस्टर रिलीज झाले आहे. आदिनाथ कोठारेने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे पोस्टरमध्ये तात्या विंचूचा अर्धा फोटो आणि आदिनाथ कोठारेचा अर्धा फोटो पाहायला मिळत आहे. या फोटोला कॅप्शन देत आदिनाथने लिहिले की, “हो हे खरं आहे. तात्या विंचू पुन्हा येतोय !!! २०२५ ला चित्रपटगृहात ! ओम फट स्वाहा !!!” Adinath Kothare New Film|

 

View this post on Instagram

 

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)

2025 मध्ये रिलीज होणार सिनेमा 

या पोस्टर वर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. मृणाल ठाकूर, अभिनय बेर्डे, प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, मंजिरी ओक, प्रियदर्शन जाधव, वैभव तत्त्ववादीने कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, ‘झपाटलेला- मी तात्या विंचू’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. Adinath Kothare New Film|

हेही वाचा: 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेचा तिढा अखेर सुटला; बड्या नेत्याला उमेदवारी जाहीर