Kabaddi : कुमार कबड्डीसाठी मैदानावरच निवड चाचणी

पुणे – तेलंगणामध्ये होणाऱ्या कुमार व कुमारी गटाच्या राष्ट्रीय अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेसाठी राज्य अजिंक्‍यपद निवड चाचणी एखाद्या

स्पर्धेतून करणे कठीण आहे. त्यामुळे मैदानावरच खेळाडूंची तंदुरुस्ती व खेळातील कसब पाहून निवड चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने दिली आहे. येथे येत्या 22 ते 25 मार्च या कालावधीत कुमार व कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार आहे.

सध्या करोनाचा धोका पुन्हा एकदा वाढल्यामुळे जळगावला 5 ते 8 मार्च यादरम्यान कुमार व कुमारी राज्य अजिंक्‍यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन अडचणीत आले आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत ही स्पर्धा न घेता मैदानी निवड चाचणी घेण्याचे संघटनेच्या कार्यकारिणी मंडळाच्या ऑनलाइन सभेत निश्‍चित करण्यात आले आहे.

संघटनेशी संलग्न असलेल्या जिल्हा संघटनेच्या खेळाडूंना या मैदानी निवड चाचणीकरिता बोलावण्यात येणार असून त्यातून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येईल.

 

Leave a Comment