शरद पवार – अजित पवार यांच्या गुप्तभेटीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या,’कौटुंबीक नाती वेगळी…’

पुणे – पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये लेन नंबर 3 या परिसरात 73 नंबरच्या एका व्यावसायिकाच्या घरामध्ये शरद पवार व अजित पवार यांची, शनिवारी (ता.१२ ऑगस्ट) भेट झाली. या भेटीनंतर बाहेर पडताना अजित पवार गाडीत झोपून गेले.

ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानंतर पवार काका – पुतण्यांमधील या भेटीबाबत विविध चर्चा रंगल्या. पडद्यामागे नेमक्या काय हालचाली सुरु आहेत याबाबतचे विविध तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली. यावर आता सुप्रिया सुळे म्हणाल्या, अनेकवेळा राजकीय मतभेद असतात. सरोज पाटील या शरद पवार यांच्या सख्ख्या बहिणी आहे.

अनेकवेळा त्यांचे पती एन डी पाटील आणि शरद पवार यांच्यात टोकाचे मतभेद झाले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. पण नात्यात कधीही अंतर पडले नाही. मी त्या बैठकीत नव्हते, त्यामुळं त्यात नेमकं काय झालं ते मला माहिती नाही. कौटुंबीक नाती वेगळी आणि राजकीय मते वेगळी असल्याचे सुळे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, चोरडिया आणि पवार कुटुंब यांचे अतिशय प्रेमाचे संबंध आहे. गेल्या सहा दशकाहून अधिक काळ झालं आमचे संबंध असेही सुळे माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या आहे.