देशातील करोना रुग्णवाढीवर आदर पुनावाला म्हणाले,”घाबरू नका…”

 बीजिंग  : जगाला धडकी भरवणारा करोना जिथून जन्माला आला त्याच चीनमध्ये पुन्हा एकदा या व्हायरसने डोके वर काढले आहे. त्यातच इथल्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण  निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभुमीवर भारतात देखील खबरदारीचे उपाय राबवण्यात येत आहेत.

चीनमधील कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि सीईओ आदर पूनावाला यांनी भारतीयांना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी त्यांनी एक ट्विट केले आहे.

आदर पुनावाला यांनी,”भारताची उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्डमुळे घाबरण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. सोबतच मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन देखील केले आहे.

“चीनमधील कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या चिंताजनक आहेत. परंतु आपलं उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्ड पाहता घाबरण्याची गरज नाही. भारत सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आपण विश्वास ठेवून त्यांचं पालन केलं पाहिजे,” असे आदर पूनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.