उर्वशीच्या ‘दिल-ए-नादन तुझे हुआ क्या है’ या पोस्टवर युजर्स म्हणाले,’ऋषभ पंतला याचे उत्तर…’

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या चर्चेत आहे. उर्वशी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत तर कधी पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाह  यांच्यावर केलेल्या कंमेंट्समुळे चर्चेत आली आहे. यावेळी ऋषभ पंत आणि उर्वशी यांच्यात सोशल मीडियावर वॉर सुरू आहे. पण आता उर्वशीने ऋषभ पंतबद्दल असे काही बोलले आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे.

नुकतेच उर्वशीने स्वतःचे काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत, पण यावेळी तिने शेअर केलेल्या फोटोपेक्षा कॅप्शन जास्त चर्चेत आहे. उर्वशीने लिहिले,”दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है? यासोबत उर्वशी रौतेलाने रडणारा इमोजी पोस्ट केला आहे.

फोटोंमध्ये उर्वशी रौतेला हेवी मेकअप करताना दिसत आहे. तिने ख्रिश्चन डायर कॅप घातली आहे.  सनग्लासेस घातलेली ती खाली उतरताना पोज देताना दिसत आहे. काळ्या जाळीचा डीप नेक टॉप ड्रेस तिने कॅरी केला आहे. तसेच सोन्याच्या बांगड्या घातल्या आहे. उर्वशी हिने तिचा लूक डायमंड इअररिंगसह पूर्ण केला आहे. केस उघडे ठेवले आहेत.

उर्वशी रौतेलाचे चाहतेही खूप सपोर्ट करताना दिसत आहेत. या पोस्टवर रेड हार्ट इमोजी पोस्ट करत आहे. काहींनी उर्वशी रौतेलाच्या पोस्टवर कमेंट सेक्शनमध्ये ऋषभ पंतचे नाव लिहून रडणारे इमोजी बनवले आहेत.

एका चाहत्याने लिहिले की, ऋषभ पंतला याचे उत्तर माहिती असावे.  उर्वशी रौतेलाच्या या पोस्टवर काही तासांतच एक लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. नुकतीच उर्वशी रौतेला गणपतीच्या पंडालमध्ये गेली होती, जिथे ऋषभ पंत तिच्या समोर येताच लोकांनी त्याचे नाव घेण्यास सुरुवात केली. यावर उर्वशी रौतेला यांनी नाराजी व्यक्त केली होती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर उर्वशी रौतेला लवकरच तेलुगुमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या अभिनेत्री चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.