nagar | गळफास घेऊन एकाची आत्महत्या

नगर, (प्रतिनिधी) – राहत्या घरी गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. अमित शरद जेऊरकर (वय 45 रा. सावेडी गाव, नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. अमित सावेडी गावातील बी – विंग, साई अपार्टमेंटच्या तीन नंबर बिल्डिंगमध्ये राहत होते.

त्यांनी मंगळवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेतला. त्यांच्या पत्नी करीना यांना माहिती मिळताच त्यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात सायंकाळी सातच्या सुमारास दाखल केले. दरम्यान ते औषधोपचारापूर्वीच मयत झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषीत केले.

तशी खबर वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे यांनी तोफखाना पोलिसांना दिली. दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान अमित यांनी आत्महत्या का केली याची माहिती समजू शकली नाही. पोलीस अंमलदार आर. एम. शिंदे अधिक तपास करत आहेत.