कांदा रडवणार! दर आणखी वाढणार…

पिंपरी – राज्यात कांदा तुटवडा कायम असून आवश्‍यकतेपेक्षा कमी आवक बाजार समित्यांमध्ये होत आहे. बाजारात कांदा 45 ते 55 रुपये किलो दराने विकला जात आहे. गेल्या काही दिवसांतच कांदा दर दुप्पट झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

जानेवारीत 25 ते 30 रुपये किलो दराने कांदा मिळत होता. परंतु फेब्रुवारीच्या पहिला आठवड्यानंतर कांदा ठिकठिकाणी 50 ते 60 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. कांदा आणखी काही काळ सर्वसामान्य ग्राहकांना रडवणार आहे. आता मार्चनंतर कांद्याचे दर कमी होण्याची शक्‍यता आहे.

देशात ठिकठिकाणी डिसेंबर आणि जानेवारीत अवकाळी पाऊस झाला होता. याचा कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. परिणामी, देशातील बाजारांत 40 टक्‍क्‍यांनी पुरवठा कमी झाला आहे. याशिवाय इंधनाचे दर वाढले आहेत. याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाला आहे.

Leave a Comment