पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : खासगी कार्यालयात फक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती; नियम मोडल्यास थेट गुन्हा

पुणे – पुण्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांना निर्बंधांना सामोरं जावं लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता, सर्व खाजगी कार्यालयांमध्ये 50 टक्के क्षमतेनेच कर्मचारी उपस्थित ठेवण्याबाबतचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. यामध्ये आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कार्यालयांना वगळण्यात आलं आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

याशिवाय सरकारी कार्यालयांचा विचार केला तर, सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग प्रमुखांनी कोरोनाची परिस्थिती कशी आहे, हे पाहावं आणि त्यानुसार कार्यालयात किती कर्मचारी बोलवावे, याबाबत निर्णय घ्यावा, असा आदेश दिला आहे.

दरम्यान, पुण्यात दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. आज (ता.20) 3111 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे.

Leave a Comment