सलून दुकाने ‘या’ तारखेपासून सुरु; मात्र… – वाचा ठाकरे सरकारची नियमावली

मुंबई – देशव्यापी लॉक डाउनच्या पहिल्या टप्प्यापासून बंद असलेल्या सलून व्यवसायाला आता राज्य सरकारतर्फे दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकारने राज्यभरातील सलून दुकाने येत्या २८ जूनपासून सुरु करता येतील असा निर्णय घेतलाय. याबाबतची माहिती शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

राज्य सरकारने सलून पुन्हा सुरु करण्याबाबतची परवानगी दिली असली तरी सलून चालकांना केवळ केस कापण्याची मुभा देण्यात आली आहे. सरकारी नियमांनुसार यापुढे केशकर्तनालयामध्ये ग्राहक व सलून कामगार या दोघांनाही मास्क वापरणे बांधकारक करण्यात आले असून सलूनमध्ये दाढी करण्यास मनाई केली आहे.

ब्युटीपार्लर, स्पा आणि जीमबाबत निर्णय प्रलंबित 
राज्यामध्ये सलून व्यावसायिकांना सशर्त परवानगी देण्यात आली असली तरी सरकारने अद्याप ब्युटीपार्लर, स्पा आणि जीमबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यातील कोरोना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याने सरकारतर्फे निर्णय घेत असताना खबदारी बाळगण्यात येत असल्याचं दिसतंय.

Leave a Comment