रसिकलाल एम. धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे  – आर. एम. धारिवाल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माणिकचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या 82 व्या जन्म दिनानिमित्त त्यांच्या कोरेगाव पार्क बंगला नं. 64 लेन क्र. 3 येथील बंगल्यावर दि. 1 मार्च रोजी सकाळी 8 सायंकाळी 7 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

रसिकलाल एम. धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त आर.एम.डी. फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वृक्षवड संपूर्ण भारतभर जपणाऱ्या फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा रसिकलाल धारिवाल यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. 2014 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिर सोहळ्याचे आयोजन संपूर्ण राज्यात ओळखले गेले. एकाच दिवशी 24 हजार रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या होत्या, अशी आठवण आजही पुणेकरांच्या लक्षात आहे.

 

 

आर.एम.डी. फाउंडेशनच्या माध्यमातून फिरत्या वातानुकूलित व्हॉल्वो बसद्वारे वर्षभर अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करून गरजूंना रक्तसाठा उपलब्ध करून दिला जातो. करोना काळातही विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून दोन हजारांवर नागरिकांनी रक्तदान केल्याची माहिती रसिकलाल धारिवाल यांच्या पत्नी आणि आर.एम.डी. फाउंडेशनच्या उपाध्यक्ष शोभा धारिवाल यांनी दिली. तसेच फाउंडेशनची ही व्हॉल्वो बस मोफत रक्तदानास कोणत्याही मंडळ, कार्यक्रम अथवा गावात संपूर्ण तांत्रिक चमूसह उपलब्ध करून दिली जात असल्याचे आणि त्याचा फायदा शिबिर आयोजित करताना घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

 

आर.एम.डी. फाउंडेशनद्वारे विविध समाजोपयोगी कामे

आर.एम.डी. फाउंडेशनच्या माध्यमातून करोना काळात हजारो गरीब-गरजू लोकांना अन्नधान्य किट्सचे वितरण केले. ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाइन शिक्षण घेता यावे, यासाठी म्हणून मोबाइलचे मोफत वाटप केले. बारामती तालुक्यात 15 गावांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, शेतीला पाणीपुरवठा व्हावा आणि धरणांतील पाणी गावांतील तळ्यात साठवण्यासाठी मोठ्या व्यासाच्या पाइपद्वारे लक्षावधी लिटर पाणी साठवणूक प्रकल्पाची सुरुवात केली. मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटलद्वारे करोना नियंत्रण कक्षाची स्थापना करून अनेक करोना रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली. आदिवासी गावांमध्ये डोळ्यांची मोफत तपासणी आणि चष्मे वाटप केले. करोना बाधितांना सेवा देणाऱ्या नर्सिंग आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. “पुलकछाया’ उपक्रमांतर्गत देशातील विविध राज्यांमध्ये वृक्षलागवड आणि संवर्धन उपक्रम घेण्यात आला. “पुलकप्याऊ’च्या माध्यमातून आधुनिक कूलर पाणपोईद्वारे शुद्ध आणि थंड पाण्याची सोय विविध ठिकाणी करण्यात आली.

 

 

नाशिक येथील हॉस्पिटल आजपासून सेवेत

दि.1 मार्च रोजी नाशिक येथे फाउंडेशनच्या सहयोगाने 165 बेड्सचे भव्य असे श्री. आर. एम. धारिवाल हॉस्पिटल ऍन्ड रीसर्च सेंटर जनसेवेसाठी सज्ज होणार असल्याची माहिती शोभा आर. धारिवाल यांनी दिली.

Leave a Comment