‘कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात जे नमूद आहे तोच आमचा अजेंडा’ – विजय वडेट्टीवार

Vijay Vadettiwar – रतलाम येथील कॉंग्रेस उमेदवाराने मतदारांना एक भलतेच आश्‍वासन दिले आहे, त्यामुळे वाद निर्माण झालाआहे, त्या संबंधात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, पक्षाच्या जाहीरनाम्यात जे लिहिले आहे तेच अंमलात आणले जाईल.

मध्य प्रदेशातील रतलाम येथील कॉंग्रेसच्या लोकसभा उमेदवाराने त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास दोन बायका असणाऱ्यांना २ लाख रुपये मिळतील असे विधान केले होते, त्यावरून सध्या टीका होते आहे.

त्यावर बोलताना वडेट्टीवार यांनी सांगितले कीे, आमच्या पक्षाचा जाहीरनामा सार्वजनिक आहे आणि त्यात जे लिहिले आहे तेच अंमलात आणले जाईल. मी किंवा कोणी काय म्हणतो याने काही फरक पडत नाही.

कॉंग्रेस सत्तेवर आल्यास, आमच्या जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे, प्रत्येक गरीब महिलेला तिच्या बँक खात्यात १ लाख रुपये दिले जातील. काँग्रेस पक्षाने ५ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुका २०२४ साठी ‘न्याय पत्र’ जाहीरनामा प्रसिद्ध केला.

त्यात काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात ‘महालक्ष्मी योजना’ सादर करण्याचे आश्वासन दिले आहे, जी गरिबी दूर करण्यासाठी गरिबांना वार्षिक १ लाख रुपये देईल.