पाकिस्तानी माऱ्यात भारतीय जवान शहीद

जम्मू-पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा शस्त्रसंधीचा भंग करत शुक्रवारी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत मारा केला. त्यामध्ये भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला. पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्‍मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशैरा क्षेत्रात गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. त्या माऱ्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी सैनिकांनी सलग तिसऱ्या दिवशी शस्त्रसंधी भंगाच्या कुरापती केल्या.

त्यांनी मागील दोन दिवस पूँच जिल्ह्यात भारतीय सीमा नाक्‍यांबरोबरच रहिवासी भागांना लक्ष्य केले. त्यामध्ये दोन महिला मृत्युमुखी पडल्या. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते. त्या आगळिकींना चोख प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांकडून अवलंबले जाते. मात्र, प्रथम शस्त्रसंधी भंग करणाऱ्या पाकिस्तानकडून त्याबाबत उलट्या बोंबा मारल्या जातात.

Leave a Comment