2 मे रोजी अनुपस्थित राहिल्यास बचावाची संधी नाही- पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा मुशर्रफ यांना इशारा

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी लष्करी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ हे 2 मे रोजी देशद्रोहाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयात उपस्थित राहिले नाही, तर त्यांना बचावाची संधी दिली जाणार नाही, असा इशारा पाकमधील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मुशर्रफ यांनी 2 मे रोजीच्या सुनावणीला उपस्थित रहावे, असे आदेश न्यायालयाने यापूर्वीच दिले आहेत.

मार्च 2014 साली देशात आणीबाणी लागू करण्यासंदर्भात माजी लष्कर प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ गटाच्या सरकारने देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे. मुशर्रफ हे वैद्यकीय उपचारांसाठी 2016 साली दुबईला निघून गेले आणि तेंव्हापासून पाकिस्तानमध्ये परतलेच नाहीत. मुशर्रफ यांच्या विरोधातील देशद्रोहाच्या खटल्याच्या सुनावणीमध्ये काहीही प्रगती झालेली नाही, असे एका वकिलाने स्वतंत्र याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर देशद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयिताला केवळ उपस्थित नाही, म्हणून सुनावणीतून सूट दिली जाऊ शकणार नाही, असे सरन्यायाधीश आसिफ सईद खोसा यांनी म्हटले आहे.

Leave a Comment