अजित पवारांकडून पालखीचे सारथ्य

बारामती/ जळोची – तुकाराम महाराज यांचा जयघोष करीत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा कविवर्य मोरोपंतांच्या बारामतीत पोहोचताच विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर अजित पवार यांनी रथात बसून पालखी सोहळ्यातील रथाचे सारथ्य केले.

पालखी सोहळा बारामती तालुक्‍यातील उंडवडी येथील मुक्‍काम आटोपून बारामती शहरात दाखल झाला. शहराच्या वेशीवर अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर देशमुख चौकातून पवार यांनी स्वतः रथाचे सारथ्य केले.

संत तुकोबांच्या दर्शनासाठी सकाळपासून रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेल्या भाविकांनी हा अनुपम भक्‍तिसोहळा डोळ्यांत साठवून घेतला. भाविकांची एकच गर्दी झाली होती.