‘पानिपत’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडिओ

मुंबई – ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारे बॉलीवूडचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुप्रतीक्षित पानीपत चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. अपेक्षेप्रमाणे भव्य सेट्स, युध्दाचे आक्रमक प्रसंग, डायलॉगबाजी, अ‌ॅक्शन आणि लव्हस्टोरी यांचा त्रिवेणी संगम यामध्ये असल्याचे दिसून येते. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. गोवारीकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा ट्रेलर शेअर केला आहे.

दरम्यान, मराठा साम्राज्याचा अस्त ज्या युद्धानंतर सुरू झाला त्या युद्धावर हा सिनेमा आधारित आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर, कृती सेनॉन, संजय दत्त, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापूरे, मोहनिश बेहेल, यांच्या प्रमुख मुख्य भूमिका आहेत.

चित्रपटात अर्जुन कपूरने साकारलेली सदाशिवभाऊंची भूमिका अपेक्षित उंची गाठताना दिसत आहे. पार्वतीबाईंच्या भूमिकेतील क्रिती सॅनॉनला पाहताना बाजीराव मस्तानीतील काशीबाईची आठवण होते. तर संजय दत्तने उभा केलेला अब्दाली जबरदस्त आहे. येत्या 6 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment