पालकांनो..! तुमची मुलं सुद्धा तुमच्या पासून ‘या’ गोष्टी लपवत आहेत का? आजच व्हा सावध, अन्यथा नंतर होईल मोठा पश्चाताप

पुणे – आपल्या मुलांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवण्यासाठी पालक अनेकदा त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. असे असूनही, अनेकदा असे दिसून येते की ते पौगंडावस्थेत पोहोचल्यानंतर मुले त्यांच्या पालकांपासून अनेक गोष्टी लपवू लागतात. जाणून घ्या अश्या ‘पाच’ गोष्टी जे मुले आपल्या पालकांपासून लपवत असतात.

१) प्रेम प्रकरण –

आजकाल काही मुलं पौगंडावस्थेत येईपर्यंत त्यांचे अफेअर्स सुरु होतात ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण अनेक वेळा मुले आई-वडिलांच्या किंवा समाजाच्या भीतीने ही गोष्ट कोणाशीही शेअर करत नाहीत. मुलाचे हे रहस्य शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मुलाला स्वातंत्र्य देणे जेणेकरून तो आपल्याशी सर्व काही गोष्टी शेअर करू शकेल. ही सवय लहानपणापासून तुमच्या मुलामध्ये रुजवावी लागेल.

२) मित्रांसह गुप्त पार्टी –

पालक बाहेर जाताच मुले मित्रांसोबत पार्टी करायला लागतात. पौगंडावस्थेत, मुलांना स्वतःसाठी काही स्वातंत्र्य हवे असते. पण हे स्वातंत्र्य त्यांना नेहमी त्यांच्या पालकांकडूनच मिळेल असे नाही. म्हणूनच ते त्यांच्या मित्रांसोबत अशा गुप्त पार्ट्यांचा आनंद घेतात.

३) शाळा बुडवणे –

काही मुले अनेकदा मित्रांसोबत हँग आउट करण्यासाठी किंवा चित्रपट पाहण्यासाठी शाळा बुडवून जात असतात. मात्र हि गोष्ट ते त्याच्या आई-वडिलांना कळू देत नाही. जर तुम्हाला तुमच्या मुलाचे हे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर नेहमी त्याच्याशी मैत्रीपूर्ण वागा, जेणेकरून तो तुमच्यापासून काहीही लपवू शकणार नाही.

४) मोबाइलवर चॅटिंग करणे –

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जवळपास प्रत्येक मुलाकडे स्वतःचा मोबाईल आहे. मित्रांसोबत केलेले चॅटिंग गुप्त ठेवण्यासाठी मुले नेहमी त्यांच्या मोबाईल फोनला लॉक ठेवत असतात. मुलांची ही सवय काही वेळा त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. हे टाळण्यासाठी पालकांनी मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवले पाहिजे.

५) वाईट सवयी –

पौगंडावस्थेत पोहोचेपर्यंत मुलांना आयुष्यातील प्रत्येक नवीन अनुभव घ्यायचा असतो. अशा परिस्थितीत अनेक वेळा ते मित्रांसोबत धूम्रपान, दारू, ड्रग्ज इत्यादी चुकीच्या व्यसनांचे बळी देखील होऊ शकतात. तुमचे मूले तुम्हाला त्यांच्या या व्यसनाबद्दल कधीच सांगणार नाही. मुलाची ही सवय जाणून घेण्यासाठी त्याच्यासोबत थोडा वेळ घालवावा तसेच त्याचे मन वाचण्याचा प्रयत्न करावा.