लग्नापूर्वी महाकाल मंदिरात पोहचले परिणीती आणि राघव चड्डा ! बाबा चरणी नतमस्तक होत केली पूजा

मुंबई – अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्यामुळे अनेकदा सोबत स्पॉट होताना दिसून येतात. अशात आता दोघेही बाबा महाकालच्या दरबारात पोहोचले.

चित्रपट अभिनेत्री परिणिती चोप्रा राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत बाबा महाकालच्या दरबारात पोहोचली, जिथे श्री महाकालेश्वर व्यवस्थापन समितीच्या नियमांचे पालन करत तिने नंदी हॉलमधून देवाची पूजा केली आणि बाबा महाकालचे दर्शन देकीहाळ घेतले.

महाकाल मंदिराचे पुजारी पंडित यश गुरू यांनी सांगितले की, परिणीती चोप्रा ही बाबा महाकालची निस्सीम भक्त आहे. 26 डिसेंबर 2022 रोजीही तिने बाबा महाकालच्या भस्म आरतीमध्ये भाग घेतला होता. यानंतर, लग्नापूर्वी ती आज बाबा महाकालचा आशीर्वाद घेण्यासाठी राघव चड्डासोबत उज्जैनला आली होती.

परिणीती चोप्राने राघव चढ्ढा हिच्यासोबत नंदी हॉलमध्ये श्री सूक्त पठण करून बाबा महाकालची विशेष पूजा केली. यावेळी ती बाबा महाकालच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसली. मंदिर प्रशासनाच्या सर्व नियमावलीचे पालन करत यावेळी परिणितीने पूजा केल्याचे समजते. यावेळी परिणीतीने पारंपरिक पद्धतीने साडी परिधान केलेली होती तर राघव चड्डा पारंपरिक कुर्त्यामध्ये दिसून आला. येत्या 25 सप्टेंबर 2023 रोजी परिणीती आणि राघव चढ्ढा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.