पिंपरी | मावळातील उमेदवारांचा पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रचारात सहभाग

पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात निवडणूक पार पडल्यतानंतर आता प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले आहे. पक्षाच्या वरिष्ठा पातळीवरून आलेल्या सूचनांनुसार हे उमेदवार आता आपल्या अथवा मित्र पक्षाच्या प्रचार सभाव रॅलीदरम्यान दिसत आहेत.

मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत बसप हा राष्ट्रीय पक्षवगळता प्रादेशिक व अपक्षांचा मोठा भरणा होता. यामध्ये महायुती व महाआघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये लढत होती. चौथ्या टप्प्यात मावळ लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतरही या उमेदवारांना आता निवडणुकीच्या प्रचारात सहभागी व्हावे लागत आहे. पाचव्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये प्रचाराने रंगत आणली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अनुभव असलेल्या या मावळ लोकसभेतील उमेदवारांना महायुती अथवा महाविकास आघाडीच्या उमेदवरांच्या प्रचारात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार चौथ्या टप्प्यातील हे बहुचर्चित चेहरे आता पाचव्या टप्प्यात अन्य उमेदवारांच्या प्रचारात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे.