पिंपरी | व्ही इनोव्हेट टेक्नोलॉजीस समवेत सामंज्यस करार

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी महाविद्यालय औदयोगिक आस्थापना यांच्यातील समन्वय निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन व्ही इनोव्हेट टेक्नोलॉजीस समवेत नुकताच सामंजस्‍य करार केला.

या प्रसंगी व्ही इनोव्हेट टेक्नोलॉजीसचे बिजनेस ऑपेरेशन हेड योगेश खंडेलवाल, एनएमआयईटीचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. सतीश मोरे, प्रा. मनोज काटे, डॉ.शेखर राहणे, प्रा.स्पंदन वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

व्ही इनोव्हेट टेक्नोलॉजीस आस्थापना ही डिजिटल ट्रान्सफॉर्मशन आणि प्रोडक्ट डेव्हलपमेन्ट या क्षेत्रात कार्यरत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजियन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, आयओटी आदी टेक्नोलॉजी पुरविण्याचे काम करीत आहे. या करारा मार्फत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, इंटर्नशिप, तसेच सी अँड सी प्लसप्लस प्रोग्रामिंग तसेच पायथॉन प्रोग्रामिंग आदीं ट्रेनिंगचा फायदा घेता येईल.