पिंपरी-चिंचवड महापालिकेचा थकबाकी वसुलीसाठी सवलतींचा पाऊस

महापालिकेचे 30 जून पूर्वी कर भरण्याचे आवाहन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत शहरातील इमारती व जमिनींवरील कर आकारणी करुन मिळकत कराची वसूली केली जाते. नागरिकांनी 30 जूनपूर्वी थकबाकी व दोन्ही सहामाहीसह संपूर्ण बिलाची एकरकमी रक्कम भरल्यास सामान्य करातील विविध सवलत योजना लागू करण्यात आल्या आहेत. या सवलतींचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने केले आहे.

शहरातील अनेक नागरिकांनी मिळकत कर थकविला असून तो वसूल करणे करसंकलन विभागाला आव्हानात्मक ठरत आहे. यामुळे, महापालिका विविध योजना राबवून नागरिकांकडून थकीत कराची वसूली लवकर करुन घेत आहे.

तसेच, डिजिटल व्यवहारांना चालना मिळण्यासाठी 30 जून 2019 अखेर मिळकत कराचा ऑनलाईन भरणा केल्यास चालू वर्षाच्या मागणीतील सामान्य करात 5 टक्के सवलत व त्यापुढे 31 मार्च 2020 पर्यत मिळकत कराचा ऑनलाईन भरणा केल्यास चालू वर्षाच्या मागणीतील सामान्य करात दोन टक्के सवलत राहणार आहे. यामुळे, मिळकतधारकांनी 30 जून पर्यत कर आकारणीचा भरणा करण्याचे, करसंकलन विभागाने सांगितले आहे.

थकबाकीसह मिळकत कर बिलाची संपूर्ण रक्कम आगाऊ भरल्यास मिळणारी सवलत

-स्वतंत्र नोंद असलेल्या निवासी मिळकतीस- 10 टक्के
-बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक व मोकळ्या जमिनी मिळकतीस – 5 टक्के

Leave a Comment