फोन टॅपिंग प्रकरण : अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल; फडणवीसांची होणार चौकशी ?

मुंबई –  महाविकास आघाडीतील मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन टॅपिंग झाले होते. हे टॅपिंग रश्मी शुक्ला यांनी केले असून जेव्हा हा प्रकार उघड झाला तेव्हा त्यांनी सरकारची माफी मागितली होती.  या प्रकरणात  आता अज्ञात व्यक्तीविरूद्ध सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणात गुप्तचर विभागाचे गोपनीय पत्रे बेकायदेशीररित्या मिळवण्यात आली होती असं तक्रारीत म्हटलं आहे.

वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट 1930 च्या शाखा 5 अंतर्गत भारतीय टेलीग्राम अधिनियम 1885 च्या कलम 30 अन्वये अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, भाजप सरकारच्या काळात विरोधकांचे फोन टॅपिंग केले जात असल्याच्या आरोपावरून  वातावरण तापले होते. फोन टॅपिंगवरून सत्ताधारी आणि भाजपामध्ये तोंड फुटले आहे. भाजप सरकारच्या काळात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे दूरध्वनी टॅप झाल्याबाबतची माहिती गंभीर आहे. सत्तेसाठी भाजप कोणत्याही पातळीला जाऊ शकते. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी सखोल उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, भाजप सत्तेत असताना फोन टॅपिंगचे कुठलेही आदेश दिले नव्हते, असे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Leave a Comment