तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक

श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा
उस्मानाबाद,दि.30: तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज पहिली माळ. सकाळपासूनच विविध भागातून येणाऱ्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान पहाटे 6 ते सकाळी 11 या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले. श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस 02 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. यात, रथ अलंकार महापूजा, मुरली अलंकार महापूजा,  शेषशाही अलंकार महापूजा, भवानी तलवार अलंकार महापूजा आणि महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. तत्पूर्वी  रविवारी रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.

Leave a Comment